Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हाय-व्हिजन संस्थेचा पियुष साहू सहा लक्ष विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट एम. एस. सी. आय. टी. विद्यार्थी

September 03, 2012

Search by Tags:  हाय व्हिजन

वाडा येथील हाय-व्हिजन कॉम्प्युटरएज्युकेशन या प्रख्यात संस्थेचा विद्यार्थी कुमार पियुष महेश साहू याची महाराष्ट्रज्ञान महामंडळ, पुणे यांनी एम. एस. सी. आय. टी. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहा लाखविद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकविवेक सावंत यांच्या हस्ते सोमवारी रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे सन्मानपत्र व रुपये पाचहजार बहाल करून पियुष महेश साहू या इय्यता नववी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाचागौरव करण्यात आला.

जानेवारीते मे २०१२ या कालावधीत एम.के.सी.एल.च्या इरा या इ-लर्निंग प्रणालीचा वापर करूनटेक-अ-चॅलेंज व टेक-अ- बिगर चॅलेंज या मध्ये मिळवलेले गुण आणि इ-पोर्टफोलिओमध्ये अपलोडकेलेल्या कृतींच्या आधारे पियुष महेश साहू याची राज्यातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थीम्हणून निवड करण्यात आल्याचे हाय-व्हिजन कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेचे संचालकप्रवीण मुकणे यांनी सांगितले.

राज्यातील मोठ्या शहरातील सर्व आधुनिक तंत्र सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थांना मागे टाकून ठाणेजिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील हाय-व्हिजन या संस्थेच्या विद्यार्थाने हे यश संपादन केल्याबद्दल पियुष महेश साहू याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Search by Tags:  हाय व्हिजन
Top

Pravin Mukane's Blog

Blog Stats
  • 871 hits
Archives